सोलापूर विद्यापीठात परिक्षेच्या निकालांचा घोळ; निकाल लागला परंतु विद्यार्थांची नावे गायब | पुढारी

सोलापूर विद्यापीठात परिक्षेच्या निकालांचा घोळ; निकाल लागला परंतु विद्यार्थांची नावे गायब

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्‍या परिक्षेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्‍थ्यांना परिक्षेला बैठक क्रंमाक दिला खरा परंतु बैठक व्यवस्‍थाच नव्हती. विद्यापीठाकडून परिक्षेबाबत नेहमीच गोंधळ असतो. यातून विद्यार्थांचे नुकसान होत आहे. याबाबत ‘दै.पुढारी’ कडून वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनास माहिती देवून विद्यार्थांच्या अडचणी विद्यापीठ प्रशासनासमोर आणले आहेत.

दरम्‍यान, मार्च 2022 या परिक्षेचे विविध विभागांचे निकाल लागण्याचे सुरू आहे. नेहमीप्रमाणे याही निकालात विद्यापीठाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. ऑनलाईन निकालामध्ये निकाल लागला परंतु विद्यार्थांचे नावेच गायब आहेत. तर काही निकालामध्ये विद्यार्थी परिक्षेला हजर असताना त्‍यांचा निकाल हा सर्वच विषय गैरहजर दिसून येतोय. तसेच काही जणांचे सर्वच विषय अनुत्तीर्ण असा निकाल लागलेला आहे. लागलेला निकाल नक्‍की कोणत्‍या विभागाचा आणि कोणाचा आहे असा प्रश्न विद्यार्थांसमोर निर्माण झाला आहे? तसेच विद्यार्थांच्या होणा-या नुकसानीस जबाबदार कोण, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसानीचे सत्र कधी थांबणार आहे असा सवाल उपस्‍थित करण्यात आला आहे.

शिक्षक म्हणतात, आम्हाला माहिती नाही 

कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेच्या  संचालक कुलगुरू डॉ. फडणवीस असून यांच्याच विभागाच्या निकालामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असल्‍याने बाकीच्या विभागांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या निकालामध्ये विद्यार्थांची नावेच गायब असल्‍याने विद्यार्थांनी संबंधीत शिक्षकांना याबाबत चौकशी केली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थांचे अडचणी सोडवण्याऐवजी उलट आम्‍हाला काही माहिती नाही तुमचे तुम्‍ही बगा, निकाल हा आम्‍ही लावला नसून तो परिक्षा विभागाने लावला आहे अशी उडवाउडवीची उत्‍तरे दिली.

– विद्यार्थी 

एसएल आर क्रमांक न लिहिल्यामुळे विद्यार्थ्यांची नावे दाखवित नसतील. सर्व उत्तर पत्रिका संगणकावर तपासण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे गैरहजर दाखवित आहे किंवा परीक्षा देऊनही नाव दाखवित नसेल तर त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये अर्ज करावे. एकाही विद्यार्थ्यांचे आम्ही नुकसान करणार नाही.

– शिवकुमार गणपुरे, परीक्षा नियंत्रक 

हेही वाचा  

सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसैनिकांना व्यक्त न होण्याचे राज ठाकरेंचे आदेश

अमरावती : दुर्गा देवी विसर्जनावेळी पूर्णा नदीत वाहून गेला तरुण

रत्नागिरी : गवारेड्याच्या हल्ल्यात माचाळ येथील शेतकरी गंभीर जखमी

 

Back to top button