पनवेल: हार्बर लाईनवर रेल्वेमध्ये महिलांची फ्री स्टाईल मारामारी..! | पुढारी

पनवेल: हार्बर लाईनवर रेल्वेमध्ये महिलांची फ्री स्टाईल मारामारी..!

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बुधवारी (दि.5) संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान लोकलमधील बसण्याचे  कारणावरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात पनवेलचे दिशेने जात असताना कोपरखैरणे येथे एक महिला रेल्‍वेत बसली. ती तुर्भेमध्ये उतरल्‍याने तेथे जागा झाली. जागा झाल्‍याने त्‍या जागी महिला बसली आणि छोट्या मुलीला बसू दिलं नाही. यावरून शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळवरून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असतात त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली. यासंदर्भात वाशी पोलीस ठाण्यात ठाण्यावरून चढलेल्या माय लेकी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button