बेळगाव : आक्षेपार्ह स्टेटस लावल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : करोशी येथे आक्षेपार्ह स्टेटस लावल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे करोशीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, चिकोडी तालुक्यातील करोशी येथे मागील ४ वर्षांपासून दुर्गामाता दौड काढली जाते. यंदा देखील गावातील तरुणांनी दौड काढली. यावेळी अन्य धर्माच्या भावना दुखावतील, अशा पद्धतीने फोटो एडिट करुन स्टेटस लावण्यात आला होता. याबाबत गावातील संतप्त जमावाने चिकोडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेले नाही. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असल्याने पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे. पोलिस स्थानकात चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर.आर.पाटील, पीएसआय यमनापा मांग यांनी दाेन्ही समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले.
हेही वाचा :
- सुश्मिताच्या नव्या प्रोजेक्टचं पोस्टर रिलीज; दिसणार या प्रसिद्ध तृतीयपंथीयाच्या भूमिकेत
- Nobel Prize in Literature : साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एर्नॉक्स यांना जाहीर!
- India vs South Africa 1st ODI : भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय