डोंबिवली : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक | पुढारी

डोंबिवली : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मानपाडा पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी अशी आहेत.

अन्सारी हा भिवंडी येथे राहणारा आहे. तर फैजल हा मुंबईतील माजगावचा रहिवासी आहे. या दोघांकडे २७२ किलो गांजा मिळून आला आहे. उंबार्ली गावातील मोकळ्या मैदानात इनोव्हा कार संशयास्पदरित्या आढळून आली. त्याठिकाणी जाऊन पोलिसानी चौकशी केली असता त्या गाडीत गांजा मिळून आला.

सदर आरोपी यांनी गांजा कोठून व कसा आणला? याबाबत तपास सुरू आहे. आरोपीत हे सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (प्रशा) सुरेश मदने हे करीत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे व पोनिरी. शेखर बागडे करत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button