अजब फतवा! महिला सुरक्षारक्षकांना खाकी हाफ पॅन्ट आणि बनियानची सक्ती

ठाणे महापालिका
ठाणे महापालिका
Published on
Updated on

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकांसाठी सरकारी खाकी हाफ पॅन्ट आणि फुल हाताचे बनियानची सक्ती करण्यात आली आहे. ठाणे पालिकेचे सुरक्षा अधिकारी मछिंद्र थोरवे यांनी हा अजब फतवा काढला आहे. थोरवे यांच्या अशा प्रकारच्या फतव्यामुळे महिला सुरक्षा वर्गात संताप निर्माण झाला आहे. सर्व महिला सुरक्षा रक्षकांनी थोरवे यांच्या वादग्रस्त कारभाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून यासंदर्भात पालिका आयुक्त यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती महिला सुरक्षा रक्षकांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेचे स्वत:चे सुरक्षारक्षक असून त्यात ८३ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, भांडुप बोर्ड सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षारक्षक बोर्डाकडूनही पालिका सुरक्षारक्षक घेते. या सर्वांची महापालिका मुख्यालय इमारत, प्रभाग समिती आणि इतर वास्तुंच्या सुरक्षा करण्यासाठी नेमणुक करण्यात आली आहे. तसेच पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेतही पालिकेचे सुऱक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. या विभागासाठी कंत्राट पद्धतीने निवृत्त पोलिस अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या कार्यपद्धतीविषयी सातत्याने तक्रारी पुढे येत आहेत. असे असतानाच नव्या फतव्यामुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

महापालिका सुरक्षारक्षकांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालिकेकडून दररोज पिटी आणि परे़डचे आयोजन करण्यात येते. यासाठी सर्वांना सकाळी ६.४५ वाजता पालिकेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सकाळी ७ ते ७.४५ या कालावधीत पिटी तर सकाळी ८ ते ९ यावेळेत परेड घेण्यात येते. महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील वरांड्यात पिटी आणि परेड घेण्यात येते. पिटी आणि परेडसाठी थोरवे यांनी नवा फतवा काढला असून त्यात गणवेशाची सक्ती केली आहे. त्यानुसार पिटी सत्रासाठी सरकारी खाकी हाफ पॅन्ट, सरकारी फुल बाह्यांची बनियान, सरकारी पिटी कॅनव्हश शूज, खाकी मौजे असा हा गणवेश असून तो महिला कर्मचाऱ्यांना परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news