कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. सुधारित बस भाडे पत्रकाची अंमलबजावणी शुक्रवारी (दि.१०) पहाटेपासून लागू करण्यात येणार आहे.
सुधारित दर खालीलप्रमाणे
कि.मी. टप्पा क्र. जुना दर रु. नवीन दर रु.
02. 1 8.00 10.00
04 2 8.00 12.00
06 3 10.00 15.00
08 4 12.00 17.00
10 5 14.00 20.00
12 6 16.00 22.00
14. 7 18.00 24.00
16 8 20.00 26.00
18 9 22.00 28.00
20 10 24.00 30.00
टप्पा क्र.11 पासून पुढे प्रत्येक टप्प्यावर रु. 2/- प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.
विविध प्रकारच्या सवलतीच्या पासेसचे दर खालीलप्रमाणे :
अ.क्र. पासचा प्रकार जुना दर रु. नवीन दर रु.
1. एक दिवसीय पास (पूर्ण आकार) रु. 35/- रु. 40/-
2. एक दिवसीय पास (अर्ध आकार) रु. 20/- रु. 20/-
3. साप्ताहिक पास रु. 200/- रु. 260/-
4. पाक्षिक पास रु. 400/- रु. 500/-
5. मासिक पास रु. 740/- रु. 920/-
6. त्रैमासिक पास रु. 2,050/- रु. 2,540/-
7. पहिली ते सातवी विद्यार्थी रु. 250/- रु. 300/-
8. आठवी ते दहावी विदयार्थी रु. 350/- रु. 400/-
50 टक्के सवलतीचे विद्यार्थी पास व 20 दिवसांच्या भाड्यात 30 दिवस प्रवासाची सवलत असणाऱ्या नियमित प्रवासी पासधारकांना ज्या-त्या टप्प्यानुसार पासेसचे दर ज्या-त्या टप्प्यातील तिकीट दरानुसार सुधारित करण्यात आले आहेत.
पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मार्गासाठी रु. 300/- व आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रु. 400/- असे पासेसचे दर एकच (Flat Rate) राहतील. ज्येष्ठ नागरिकांच्या अर्धा आकार तिकीटासाठी वयाची अट 65 ऐवजी 60 वर्षे अशी सुधारित केली असून, ही सवलत फक्त कोल्हापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांना लागू राहील. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायम स्वरुपी ओळखपत्रासाठी रु.150/- असा दर करण्यात आला आहे. तसेच, सवलत पासेससाठी आवश्यक असणारा RFID कार्डचा दर रु.80/- करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?