उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंबासे यांनी सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती केली. सकाळी 11.30 वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह, याचे हवन करण्यात आले. दुपारी 4.45 वाजता पूर्णाहुती करण्यात आली. नंतर परंपरे नुसार कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थानच्यावतीने येथे पूर्णाहुती करण्यात आली.
महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.
श्री गणेश विहार मध्ये हैद्राबाद संस्थान तर्फे विशाल कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. कोल्हापूर संस्थानच्यावतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. नंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा, आरती, मा. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला.
यावेळी डॉ.योगेश खरमाटे, उप विभागीय अधिकारी तथा विश्वस्त सदस्य, सौदागर तांदळे, तहसीलदार तुळजापूर, योगिता कोल्हे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), विश्वास कदम सहायक व्यवस्थापक (धार्मिक),नागेश शितोळे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांच्यासह नागेशशास्त्री नंदीबुवा, राजाराम अंबुलगे, सुनित पाठक, राजन पाठक राजू प्रयाग, शैलेश पाठक प्रल्हाद पैठणकर अंनत कांबळे, मयुर कमठाणकर हे उपस्थित होते.
हेही वाचा