काेल्‍हापूर : श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगद्धात्री रूपात पूजा (Video) | पुढारी

काेल्‍हापूर : श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगद्धात्री रूपात पूजा (Video)

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज (दि. ४) नवव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगद्धात्री रूपात पूजा बांधण्‍यात आली.

नवरात्रोत्सवात आपण विविध रूपातील जगदंबेचे दर्शन घेतले; परंतु, या ९ रूपांखेरीजही तिची अनेक रूपे आहेत. त्या सगळ्यांचे वैभव जाणून घेणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे जे घडू शकतं ते घडून न देणारी आणि जे घडणार नाही‌ तेही सहज घडवणारी अशी अतर्क्य जगदंबा म्हणजेच विश्वेश्वरी जगद्धात्री. आज (दि. ४) खंडेनवमीनिमित्त  श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगद्धात्री या रूपात पूजा बांधण्‍यात आली.  ही पूजा गजानन मुनीश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी साकारली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button