पुढारी ऑनलाईन डेस्क : कत्तलखान्याकडे नेल्या जात असलेल्या १ हजार मांजरींची चीनमधील पोलिसांनी सुटका केली आहे. अॅनिमल वेल्फेअर अॅक्टिव्हिस्ट सूचनेवर कारवाई करत पोलिसांनी पूर्वेकडील झांगजियागांग शहरात मांजर घेऊन जाणारा ट्रक अडवला. हा ट्रक अडवत पोलिसांनी १ हजार मांजरींची सुटका केली आहे. या मांजरी पुढे डुकराचे किंवा मटन म्हणून विकल्या जातात, असे मीडिया रिपोट्समधून सांगण्यात आले आहे.
द पेपरने दिलेल्या वृत्तानुसार, मांजरींना आश्रयस्थानात हलविण्यात आले आहे. या बचावामुळे मांजरीच्या मांसाचा अवैध व्यापार उघड झाला आहे. शिवाय अन्न सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. सुटका केलेल्या मांजरी भटक्या होत्या की पाळीव? हे अद्याप समजलेले नाही. त्या देशाच्या दक्षिणेकडे ट्रान्झिटमध्ये होत्या. पुढे त्यांना डुकराचे मांस म्हणून सर्व्ह जाणार होते.
अॅक्टिव्हिस्टच्या मतानुसार, झांगजियागँगमधील स्मशानभूमीत मोठ्या संख्येने मांजरींना लाकडी पेटीत ठेवल्याचे दिसले आणि सहा दिवस मी त्यांचे निरीक्षण केले. १२ ऑक्टोबर रोजी मांजरांना ट्रकवर चढवले जात असताना मी वाहन थांबवले आणि पोलिसांना बोलावले.