शरद पवार लोकांच्या भावना समजून घेतात : मंत्री दिलीप वळसे पाटील | पुढारी

शरद पवार लोकांच्या भावना समजून घेतात : मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी जालन्याला गेले आहेत. ज्या वेळेस अशा घटना घडतात तेव्हा ते जातात.समाजामध्ये नेहमी हे वेगळी भूमिका मांडतात त्यातून हे घडल असावं. मराठा आरक्षणाला सर्वांचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षाकडून राजकारण केलं जात आहे अस वाटत नसल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

पुण्यामध्ये शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस वळसे पाटील उपस्थित होते, त्याप्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जालन्याला जाऊन राजकारण करत आहेत का, या पत्रकारांच्या प्रश्नावर वळसे पाटील बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले, जालन्यातील घेटनेसारखी प्रकरणे अधिक समजदारपणे हाताळायला पाहिजे. काही घटक अशा घटनांचा फायदा घेतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशी घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस पोलिसांनी खूप संयमाने परिस्थिती हाताळावी लागते. पोलिसांनी एवढी आक्रमक भूमिका का घेतली? हा चौकशीचा भाग आहे. चौकशी केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही. समाजामध्ये असे काही घटक असतात ज्याच्यामधून शांतता बिघडवाची असते. त्याचा फायदा घेत असतात. शासनाचे प्रतिनिधी कुणी जालन्याला भेट देतील.

दरम्यान, जालनच्या घटनेमध्ये कोणताही राजकीय पक्ष असेल असे मला वाटत नाही. काही लोक त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी सगळ्यांनी बसून त्यावर लक्ष घातलं पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या केसचा निकाल लागला पाहिजे. मग त्याच्यात मध्ये पुढे जाता येईल, असेही वळसे पाटील यावेळी म्हणाले.

Back to top button