सोलापूर : अंकोलीच्या शेतकरी कन्येची वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : अंकोली (ता.मोहोळ) येथील शेतकरी कुटुंबातील विद्या सिताराम गायकवाड यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांनी महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने त्यांची निवड झाली आहे. अंकोली सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कन्येने हे यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्राप्त केले आहे. मोहोळ तालुक्यातील युवकांसमोर विशेष करून विद्यार्थिंनी समोर आदर्श निर्माण केला आहे.
या बाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी राजपत्रित तांत्रिकसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा ही दिली. त्यानंत चा टप्पा म्हणजे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ती एप्रिल २०२३ मध्ये दिली. त्याचा निकाल लागला आणि मी महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
हे समजल्यावर आनंदाला पारावर उरला नाही. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याची पावती मिळाली होती. यशाने तीन वेळा हुलकावणी दिली. तरी ही नाराज न होता मनात जिद्द बाळगून अखेर चौथ्या टप्प्यात यशाला गवसणी घातली आहे.माझे आई-वडील शेती करतात. वडील शेती बघतबघत छोटे मोठे बांधकामाचे ठेके घेतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अडचणीची मला जाण आहे.
मी ग्रामीण भागातीलच आहे. त्यामुळे प्रशासनात चांगला अधिकारी म्हणून सर्वसामान्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे विद्या गायकवाड यांनी सांगितले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्या यांचे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत व महाविद्यालयात झाले. तर बारावीचे शिक्षण सोलापूर येथील जोशी महाविद्याल यात झालेआहे.
वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजनजी पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने, सिनेटसदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक नागराज पाटील,लोकनेते शुगर चे संचालक संदीप पवार,सरपंच पांडूरंग येळवे,सचिव सचिन पाटील, सीताराम गायकवाड,रविराज गायकवाड सह इतर उपस्थित होते.
हेही वाचा :