कोल्हापूर : जुने दानवाडच्या सरपंचपदी राजश्री तासगावे यांची बिनविरोध निवड | पुढारी

कोल्हापूर : जुने दानवाडच्या सरपंचपदी राजश्री तासगावे यांची बिनविरोध निवड

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : जुने दानवाड (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी श्रीमती राजश्री संजय तासगावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एम एस कुंभार यांनी काम पाहिले.

माजी सरपंच वैशाली पाटील यांनी रोटेशननुसार आपला कार्यकाळ संपताच राजीनामा दिला होता. त्यामुळे नुतन सरपंच निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीमती राजश्री तासगावे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची मंडळ अधिकारी एम एस कुंभार यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.

याप्रसंगी ग्रामसेविका सारीका मोटे, पोलीस पाटील स्वाती कुन्नूरे, उपसरपंच प्रविण वडगावे, माजी सरपंच वैशाली पाटील, शिवराज तासगावे, सदस्य रघुनाथ कांबळे, बापूसाहेब बेडकिहाळे, बंडू अंबुपे, शानाबाई कोळी, राजश्री पाटील, अनंतमती चौगुले तसेच मल्लीनाथ पाटील, भरमा गुरव, वर्धमान तिप्पाण्णावर, सुकुमार पाटील, शिवाजी कोळी, महावीर चौगुले, प्रविण पाटील, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button