सोलापूर : जिल्ह्यातील ४० मंडळात प्रमाणापेक्षा कमी पाऊस | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यातील ४० मंडळात प्रमाणापेक्षा कमी पाऊस

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तातडीने गाव निहाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतील पहिल्या टप्यात २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. गाव पातळीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी सहायक, विमा कंपनीचा प्रतिनिधी यांच्यासोबत शेतकरी हे सुद्धा असणार आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात पाऊस नसल्याने पिकांची वाढ थांबली आहे. ज्या मंडलात सलग २१ दिवस पाऊस पडला नाही, अशा मंडळातील पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पीक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल ७१ मंडळात कमी पाऊस झाल्याचे सर्वेक्षणा दरम्यान आढळून आले आहे.

राज्य सरकारने जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांच्यासह कृषी विभागाची टीम जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण करीत आहे. सुरुवातीला २१ दिवस पाऊस न पडलेल्या मंडलांची संख्या ३० होती, सर्वेक्षण सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा ३३ मंडला पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे आढळले आहे. मंगळवारी झालेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील आणखी ७ मंडलात सलग २१ दिवस पाऊस नसल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा; 

Back to top button