युथ एशियन योगा गेम्समध्ये आर्या जाधवने मिळवले ब्राँझ पदक | पुढारी

युथ एशियन योगा गेम्समध्ये आर्या जाधवने मिळवले ब्राँझ पदक

वाकड (पुणे): युथ एशियन योगा गेम्स मध्ये आर्या जाधवने ब्राँझ पदक मिळवले आहे. भारतीयांची मान तिच्या यशामुळे उंचावली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीलंका येथे 26 ते 31 ऑगस्ट दरम्यान युथ एशियन योगा गेम्स सुरु आहेत. त्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निगडी येथील अभिश्री राजपूत यांची निवड झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ 24 ऑगस्ट रोजी श्रीलंकेला गेला असून तिथे झालेल्या योगा गेम्स मध्ये आर्या जाधव हिने ब्राँझ पदक मिळविले.

मुलीची उत्तुंग भरारी पाहून अभिमानाने तिच्या आई-वडिलांचा ऊर भरून आला असून लहानपणापासून तिला शिकवलेल्या कष्टाचे चीज झाले असे मत आर्याचे आई- वडील निलेश जाधव आणि रेखा जाधव यांनी व्यक्त केले. आज प्रत्येक भारतीयसाठी आनंदाचा क्षण असून, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे, असंही त्यांनी म्हटले.

”21व्या शतकात आता मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाने आपल्या मुलीला शिकवावे. मुलींनीही आता प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून समाजाने मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. ”

– अतुल जाधव, मुलीचे चुलते

हेही वाचा:

water shortage : पुणे विभागात तीव्र पाणीटंचाई; ऐन पावसाळ्यात 155 टँकर

पुणे : वस्तीतील मुलांचीही जुळतेय संगीताशी नाळ

पुणे : बिबवेवाडीकरांची दमछाक ! रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू

 

 

Back to top button