सोलापूर : सराईत गुन्हेगार सद्दाम शेख स्थानबध्द | पुढारी

सोलापूर : सराईत गुन्हेगार सद्दाम शेख स्थानबध्द

कामती; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील रहिवासी सद्दाम रशीद शेख याच्यावर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याची दहशत निर्माण व्हावी व आर्थिक फायदा मिळावा याकरीता तो गुन्हेगारी वर्तन करत होता.

Ajit Pawar : आपत्तीग्रस्तांच्या निधीप्रश्नी नियमांचा बाऊ नको; उपमुख्यमंत्री पवार यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश

सोलापूर, पुणे, कोल्हापूर जिल्हयात खुनाचा प्रयत्न, अपहरण, सरकारी कामात अडथळा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ, दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे तसेच विनापरवाना वाळूची चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, असे अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

अशा प्रकारचे गुन्हे करुन सद्दाम शेख याने परिसरात दहशत व भिती निर्माण केली होती. सद्दाम याच्या गुन्हेगारीवर वेळीच प्रतिबंध राहण्याकरीता तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, कामती पोलीस ठाणे यांनी M. P. D. A. अधिनियम अन्वये पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला होता.

सोलापूरचे तात्कालीन जिल्हादंडाधीकारी आणि जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण विभाग अमोल भारती, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश माने, राजकुमार डुणगे, पोउपनि सुखदेव गोदे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

हेही वाचा :

Back to top button