पुणे : पोलिस ठाण्याजवळच तरुणीचा विनयभंग ; रिक्षाचालकाला पोलिसांकडून अटक | पुढारी

पुणे : पोलिस ठाण्याजवळच तरुणीचा विनयभंग ; रिक्षाचालकाला पोलिसांकडून अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  हडपसर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच कॉलेज तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर गाडीतळ परिसरातील दुर्वांकुर मोबाईल शॉपजवळ घडला. याप्रकरणी एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. सेंदीक शमशुद्दीन तांबोळी (सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत एका 18 वर्षीय कॉलेज तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा रिक्षाचालक आहे. तर तरुणी हडपसर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. दि. 24 जुलै तरुणी हडपसर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या दुर्वांकुर मोबाईल शॉप समोरून पायी जात असताना रिक्षामध्ये आलेल्या तांबोळी याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसण्यास सांगितले; परंतु तिने रिक्षात बसण्यास नकार दिल्याने त्याने तिचा हात पकडत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Almatti Dam : अलमट्टीतून विसर्ग वाढविला; कोल्हापूर, सांगलीला तुर्तास दिलासा

US Fed Rate Hike | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पुन्हा वाढ, दराने २२ वर्षांचा उच्चांक गाठला

Back to top button