सोलापूर : चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी | पुढारी

सोलापूर : चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी

सांगोला(सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : सांगोला मिरज रोडवर अनकढाळ टोल नाक्याजवळ चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.९) सायंकाळी सातच्या सुमारास नागपूर – रत्नागिरी महामार्गावर घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नागपूर महामार्गावरील अनकढाळ टोलनाक्याजवळ खडी क्रशर समोर मोटार सायकलला चारचाकी वाहनाने (वा. क्र. एमएच १३ इसी ४४३३) ने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील चंद्रकांत नाथा गाडे (रा. उदनवाडी) यांचा जागीच मत्यू झाला. तर कबीर हरी गाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सांगोला येथे उपचार चालू आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार घेण्याचे काम चालू होते.

अधिक वाचा :

Back to top button