शरद पवार धमकी प्रकरणाची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी: अनिल देशमुख | पुढारी

शरद पवार धमकी प्रकरणाची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी: अनिल देशमुख

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घ्यायला हवी, तातडीने चौकशी करीत अटक केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि.९) येथे केली.

आज ज्या घटना घडत आहेत, त्यावर संजय राऊत बोलत आहेत. राऊत यांनाही धमकी दिली आहे, महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे, जाती जातीत तेढ निर्माण होत आहे, ज्येष्ठ नेत्यांना धमकी दिली जात आहे, या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे. कोल्हापुरात जे घडले त्याची दखल घेतली पाहिजे. राज्यात मी सुद्धा गृहमंत्री होतो, असे कधी झाले नाही. पोलिसांचा धाक कमी झाला का? असा सवाल उपस्थित करीत सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे. रोज नवीन नवीन घटना घडत आहेत, जशा निवडणूक जवळ येतील, तशा घटना घडतील, असे दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देशमुख म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button