Kajol : काजोलचा धक्कादायक निर्णय, सोशल मीडियावरील डिलीट केल्या सर्व पोस्ट

KAJOL
KAJOL

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुछ कुछ होता है, दिलवाले यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या काजोलने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री काजोलचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोईंग आहे. तिचे १४.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. जी तिच्या पर्सनल लाईफचे अपडेट्स मिळवण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान, तिने सोशल मीडियातून ब्रेक घेतला आहे. (Kajol ) काजोलने काहीवेळा पूर्वी एक पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये तिने सोशल मीडियातून ब्रेक घेण्याविषयी म्हटले आहे. यानंतर चाहते तिला असे करण्यामागचे कारण विचारत आहेत.  (Kajol )

काजोलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे." या पोस्टसोबत जे फोटो शेअर करण्यात आले, यामध्ये लिहिण्यात आलंय की, "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग फेस करत आहे."

या पोस्टशिवाय, तिने इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट केले आहेत.

ही पोस्ट शेअर करत फॅन्सने हार्ट इमोजी शेअर केलीय. एका युजरने लिहिलंय-लव्ह यू तुम्ही सुरक्षित आणि निरोगी राहा. दुसऱ्या युजरने लिहिलंय, मला माहिती नाही की, असं काय झालं आहे. तुम्ही असा निर्णय घेतला आहे, पण, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आम्ही तुमचे कॅप्शन आणि सुंदर पोस्टची आठवण करत राहू. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. काजोल शेवटी सलाम वेंकी चित्रपटात दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news