

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : उजनी -सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामा संदर्भातील स्मार्ट सिटी व जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनी सोबतच्या तडजोडीवर सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. चार तास दीर्घ चर्चा झाली मात्र रक्कम देण्यासंदर्भात दावा प्रती, दावा कायम राहिला. दरम्यान, सोमवारी 24 एप्रिल रोजी यासंदर्भात लवादाकडे सुनावणी होणार आहे.
सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक बुधवारी सायंकाळी सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत उजनी- सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामा संदर्भात जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीने लवादात धाव घेतली होती. या संदर्भात स्मार्ट सिटी व पोचमपाड कंपनी यांच्यात तडजोड करण्यासंदर्भात नियम अटी शर्तीचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याच्या विषयावर चर्चा झाली. तब्बल चार तास या बैठकीत चर्चा झाली.
जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीने 170 एम एल डी योजनेचा कामासाठी 615 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. त्यास त्यांची संमती आहे मात्र दुसरा विषय म्हणजे 110 एम एल डी योजनेतील जुन्या कामा संदर्भात जुना मक्तेदार पोचमपाड कंपनीने 128 कोटी रुपये अधिक खर्च झालेली रक्कम मागणी केलेली आहे तर दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनी 187 कोटी झालेली नुकसान भरपाई मागणीचा दावा करत आहे. अशा पद्धतीने स्मार्ट सिटी यांच्यात दावाप्रती दावा कायम राहिला अंतिम निर्णय यावर होऊ शकला नाही. दावेप्रति दावे यामधील आकडेवारीवर दीर्घ चर्चा झाली एकमत होऊ शकले नाही जुन्या कामाचे किती पैसे द्यायचे यावर केवळ चर्चा झाली. येत्या सोमवारी 24 एप्रिल रोजी लवादाकडे याप्रकरणी सुनावणी आहे तत्पूर्वी चर्चेअंती तडजोडीवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
नव्या 170 एम एल डी योजनेचे काम 615 कोटी मध्ये करण्याची तयारी पोचमपाड कंपनीने दर्शविली आहे. त्या संमती दिली आहे. त्यामुळे नव्या कामा चा विषय आता मार्गी लागला आहे परंतु जुन्या मग त्यातील केलेल्या कामाचा विषय अनिर्णित राहिला.
जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीने 128 कोटी रुपये वाढीव खर्चाची रक्कम मागणी केली आहे तर स्मार्ट सिटी कंपनीकडून 187 कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा केला आहे. यामध्ये स्मार्ट सिटी कंपनीचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी पुन्हा आता चर्चा होऊन यावर अंतिम निर्णय होणार आहे, असे सीईओ यांनी माहिती दिली.
.हेही वाचा