सोलापूर जिल्‍हात अवकाळी पावसाने फळबागा,नगदी पिकांचे नुकसान | पुढारी

सोलापूर जिल्‍हात अवकाळी पावसाने फळबागा,नगदी पिकांचे नुकसान

जेऊर(सोलापूर),पुढरी वृत्‍तसेवा : सोलापूर शहरासह जिल्‍हात गुरूवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास मेघराजाने हिसकावून घेतला आहे.

करमाळा तालुक्यातील जेऊर, शेलगाव (वा), शेटफळ, केडगाव, चीखलठान, वाशिंबे, पारेवाडी भागातील फळबाग तसेच नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, पेरू या फळबागांसह गहू, मका या नगदी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या नुकसानाची शासनाने लवकरात लवकर भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

तालुक्यात गहू काढणीला वेग आला होता मात्र काढणी पूर्वीच गव्हाचे नुकसान होवून गहू जमीनधोस्त झाला आहे. गेल्‍या ६ महिन्यांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली परंतु अद्याप देखील त्याची भरपाई देण्यात आली नाही आणि आता पुन्हा एकदा पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का असा सवाल शेतक-यांनी केली आहे.

.हेही वाचा 

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचा आरोप, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

अवकाळी पावसाने सोलापूरला झोडपले, हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान

सोलापूर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ‘तडजोड’ योजनेतून ९९ शेतकरी कर्जमुक्त

Back to top button