अवकाळी पावसाने सोलापूरला झोडपले, हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान | पुढारी

अवकाळी पावसाने सोलापूरला झोडपले, हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहर जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने दर्शन दिले. दुष्काळाने आधीच मेटाकुटीला आलेल्या सोलापुरातील शेतकऱ्यांच्या संकटात या पावसाने आणखी भर घातली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं या पावसामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.

निसर्गाचा लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक जिल्ह्याचा तापमानाचा पारा वाढला आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

गेल्या दोनदिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये हवेत गारवा निर्माण झाला होता. बुधवारी 15 मार्च रोजी मध्यरात्री काही प्रमाणात पावसाच्या सरीही कोसळल्या होत्या. गुरुवारी 16 मार्च रोजी रात्री आठ वाजल्यापासून अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला. जोरदार पावसाने रस्ते ओले झाले. शहरातील अनेक भागात लाईट बंद झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये तारांबळ उडाली.

Back to top button