चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित आरोपीचा उपचारावेळी मृत्यू | पुढारी

चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित आरोपीचा उपचारावेळी मृत्यू

सोलापूर; पुढारी ऑनलाईन :

विजापूर नाका पोलीस ठाण्यात चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये अटक करण्‍यात आलेला संशयित आरोपी भीमा काळे ( रा. कुर्डूवाडी ) याचा रविवारी सायंकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पोलिसांच्या (विजापूर नाका पोलीस) मारहाणीतच भीमा काळेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची पत्नी आणि त्यांचे वकील ॲड. बायस यांनी केला आहे.

या प्रकरणी सोमवारी सकाळी ११ वाजता महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला.

उपमहापौर राजेश काळे आणि परमेश्वर काळे लक्ष्‍मण भोसले यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला.

महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे गेट स्वतःहून बंद केले. दरम्यान यावेळी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

मृत भीमा काळे याला न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित पोलिसांवर ॲट्रॉसिटी दाखल करून त्यांना अटक करावी. मृताच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

हेही वाचलं का?

Back to top button