काळबादेवी येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू | पुढारी

काळबादेवी येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: काळबादेवी येथे रविवारी (दि.३) रात्री इमारतीचा भाग कोसळून सुंदर सॉ या ६१ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळबादेवी येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालय व चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला.

त्यानंतर म्हाडा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने इमारतीमधील सर्व रहिवाशांना वेळेत सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, काळबादेवीच्या दादी सेठ अग्यारी लेनमधील इमारत क्रमांक पाचमध्ये ही दुर्घटना घडली आहे. प्रथमदर्शनी इमारतीच्या काही भागांत भेगा पडल्याचे दिसत आहे. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घनेनंतर जखमी ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीस मृत असल्याचे घोषित केले.

म्हाडा व पोलीस प्रशासनाकडून ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणांनी घडली आहे? याचा तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

Back to top button