solapur
solapur

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोहोळच्या राजन पाटलांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

Published on

पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा – गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी आज माजी आमदार राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. डॉ. सावंत हे आज बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट देत तेथील पाहुणचार स्वीकारला.

याबाबत बाळराजे पाटील यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे- मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज आमच्या घरी भेट देऊन आदरातिथ्य स्वीकारले. पाटील परिवाराची आणि मोहोळ मतदार संघातील विकासकामांची माहीती घेत चर्चा, विचारपूस केली. आम्हा युवा पिढीस मार्गदर्शन केले. तसेच या पुढील काळातही पाटील परिवाराशी असलेला स्नेह वृद्धिंगत होत राहील.

माजी आमदार राजन पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याचे अनेक दिवसांपासून चर्चिले जात आहे. मात्र पाटील परिवाराकडून या वृताबाबत कुठेही अधिकृत दुजोरा दिला गेला नाही. मात्र आज गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी पाहुणचार घेतल्याने पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news