Solapur : लाच प्रकरणातील सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित | पुढारी

Solapur : लाच प्रकरणातील सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सोमवारी (दि. ७) राज्य शासनाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Solapur)

याबाबतच्या अधिक माहिती अशी की, किरण लोहार यांना दि. ३१ ऑक्टोबर रोजी २५००० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. दि. ३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून याबाबतच्या चौकशीचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल पाठवला होता. त्यानुसार सोमवारी (दि. ७) राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे. (Solapur)

निलंबन आदेशानुसार किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. सोलापूर यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ते निलंबित राहतील. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button