युवकाच्या खुनाने तळेगाव हादरले, तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

युवकाच्या खुनाने तळेगाव हादरले, तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा :  जुन्या भांडणाच्या कारणावरुन रॉड आणि कोयत्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना तळेगाव दाभाडे येथील तुकाराम नगर येथे रविवारी रात्री ९.३० ते १०.३०च्या दरम्यान घडली. प्रवण अनिल मांडेकर (वय१९ इंदोरी ता.मावळ जि.पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

या संदर्भात मृताचे वडील अनिल ज्ञानेश्वर मांडेकर यांनी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.  सुमारे २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे,सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घणवट, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी करीत आहेत.

Back to top button