केडगाव : महामार्गावर खडीमुळे अपघाताची शक्यता | पुढारी

केडगाव : महामार्गावर खडीमुळे अपघाताची शक्यता

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर खडी पडल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. भांडगावच्या हद्दीत रविवारी (दि. 6) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खडी पडल्याने वाहतुकीच्या या रस्त्याला मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या दिवस लहान असल्याने सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता होतो आणि अंधार पडत असल्याने ती दिसणार नाही. परिणामी, अपघातांचे कारण होऊ शकते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगावच्या हद्दीत खडी वाहतूक करणार्‍या वाहनातून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खडी पडली आहे. दिवस लहान आणि रात्र मोठी असल्याने खडी पडल्यानंतर काही वेळात अंधार झाला आहे. सोलापूरकडून पुण्याला जाणार्‍या मार्गावर ती मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या सर्वांना अचानक पसरलेल्या खडीचा झटका बसणार आहे. भरधाव वेगात वाहनांना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. ही खडी हटविणारी यंत्रणा घटनास्थळी आलेली नसल्याचे समजते.

Back to top button