सोलापूर : जिल्ह्यातील सहकारी संस्थांना लेखापरीक्षणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यातील सहकारी संस्थांना लेखापरीक्षणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांना शासनाने लेखापरीक्षण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आदेशान्वये मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण डिसेंबर २०२० व वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा कालावधी मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा २०२०-२०२१ या वित्तीय वर्षातील लेखापरिक्षण कालावधी ३१ डिसेंबर २०२१ तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा कालावधी ३१ मार्च, २०२२ पर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे २०२१-२०२२ या वित्तीय वर्षाचे लेखापरीक्षण करण्याकरीता आवश्यक ती तयारी करण्यास पुरेसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे सहकारी संस्थांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थाच्या २०२१-२०२२ या वित्तीय वर्षातील लेखापरीक्षण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. याबाबतचे पत्र सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी काढले आहे.

हेही वाचा :

Back to top button