LPG ग्राहकांसाठी बातमी; आता वर्षाला मिळणार फक्त १५ सिलिंडर | पुढारी

LPG ग्राहकांसाठी बातमी; आता वर्षाला मिळणार फक्त १५ सिलिंडर

पुढारी ऑनलाईन डेस्क : घरगुती LPG गॅस सिलिंडर धारकांना आता रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नवीन नियमांनुसार ग्राहकांना आता एका वर्षात फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना १५ पेक्षा जादा सिलिंडर मिळणार नसल्याने सर्वसामान्य जनतेला हा आणखी एक धक्का बसला आहे.

आतापर्यंत घरगुती एलपीजी सिलिंडरधारक महिन्याला हवे तितके सिलिंडर घेत होते. पण नवीन नियामांनुसार ग्राहकांचा प्रत्येक महिन्याचा कोटा निश्चित केला आहे. एका महिन्यात जास्तीत जास्त २ सिलिंडर घेता येणार आहेत. सिलिंडरच्या संख्येवर रेशनिंग केले जाणार असल्याने वर्षाला फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत. आतापर्यंत सिलिंडर घेण्यासाठी काही महिने किंवा वर्षांचे रेशनिंग नव्हते. बदललेल्या नियमानुसार वर्षाला फक्त १२ सिलिंडरवरच सब्सिडी मिळणार आहे.

या कारणांमुळे बदलेले नियम

मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रिफिलचा वापर जास्त केला जातो. याबाबत अनेक तक्रारी आल्याने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्याता आणण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button