सोलापूर : …तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला : सुशीलकुमार शिंदे | पुढारी

सोलापूर : ...तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्री पदावरुन काढले. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला.

सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला २ टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम केले होते. आता जनता विसरून गेले की सुशीलकुमारांनी कोणकोणती चांगली काम केलेली आहेत.

यापुढे बोलताना त्यांनी गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती असल्यामुळे मला ते करावे लागले असे मस्करीत म्हटले आहे. तर पक्षातील लोकांनी कारस्थान करून मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठवले. पण ठिक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रीमंडळात गेलो. मात्र, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत आहे. तरीही आपण प्रामाणिकपणे आपले काम करत राहिलो, असे त्यानी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button