दिघीत चोरलेल्या शेळ्या लोणीत केल्या हस्तगत | पुढारी

दिघीत चोरलेल्या शेळ्या लोणीत केल्या हस्तगत

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथून संदीप भाऊसाहेब कांबळे (रा. गोंधवणी, वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर) यांच्या शेळी (गोट) फार्ममधून 6 शेळ्या चोरून त्या लोणी येथील बाजारात नेवून विक्री केल्याप्रकरणी 3 शेळ्यांसह दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दामिनी बबन राशीनकर (वय 20 वर्षे, रा. झडे हॉस्पिटल मागे, वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) व मनोज उत्तम जाधव (वय 26, वर्षे, रा. वाकडी, ता. राहाता) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरी गेलेल्या शेळ्यांचा शोध घेण्यास पोलिस लोणी येथे गेले असता फिर्यादीने आपल्या शेळ्या ओळखल्या.

शेळ्या विकत घेणारांनी राशिनकर व जाधव यांच्याकडून 3 शेळ्या 26 हजार रुपयांना घेतल्याचे सांगितले. याबाबत संदीप भाऊसाहेब कांबळे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. या दोन्ही संशयितांना शहर पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  पो. नि. गवळी व सपोनि जीवन बोरसे, पो. ना. साईनाथ राशीनकर, पो. ना. रघुवीर कारखेले, पो. शि. गौतम लगड, पो. शि. राहुल नरवडे, पो. शि. गणेश गावडे, पो. शि. रमिझराजा अत्तार, पो. शि. बाळासाहेब गुंजाळ, म. पो. शि. मिरा सरग, म. पो. शि. योगिता निकम यांनी केली.

Back to top button