सोलापूर; पूढारी वृत्तसेवा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर (स्वायत्त) येथील प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अमोल ममलय्या यांच्या संशोधनास भारतीय पेटंट मंजूर झाले आहे. त्यांनी पाण्यातील अळ्या शोधणारे व पाणी तपासणी करणारे छोटे यंत्र विकसित केले आहे. पाण्यामध्ये विविध प्रकारच्या कीटकांच्या अळ्या असतात. त्यातील बऱ्याचशा कीटकांच्या अळ्या उपद्रवी व अपायकारक असून या यंत्राच्या मदतीने त्यांचा शोध घेणे सोपे होणार आहे. याच यंत्रासाठीच्या निर्मितीचे पेटंट त्यांना प्राप्त झाले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरला भारत सरकारचे पेटंट
या छोट्या यंत्राच्या मदतीने कमी वेळेमध्ये पाण्याची गुणवत्ता व त्यातील अळ्यांचा शोध घेणे सोपे होणार आहे. या यंत्राची निर्मिती डॉ. अमोल ममलय्या यांच्या सह रयत शिक्षण संस्थेच्या, कर्मवीर भाऊराव पाटील, जुनिअर महाविद्यालय, आसखेडा, नाशिक येथील शिक्षक श्री. राजेंद्र काकुळते, रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालय, दहिवडी येथील पदार्थविज्ञान विभागातील प्रा. डॉ. विजयालक्ष्मी ममलय्या व वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. कु. अनिता ममलय्या यांनी केली आहे.
महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील हे पहिलेच पेटंट असून या यंत्राचा समाजासाठी व जैवविविधतेच्या व्यावास्थापानास्ठी निश्चितपने उपयोग होणार असल्याचे संशोधक प्राध्यापकांनी नमूद केले. डॉ. अमोल ममलय्या, श्री. राजेंद्र काकुळते, प्रा. डॉ. विजयालक्ष्मी ममलय्या व प्रा. कु. अनिता ममलय्या यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अॅड. भगीरथ शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. संजीव पाटील साहेब, महाविद्यालयविकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जे. साळुंखे, कला शाखेचे उपप्राचार्य. डॉ. टी.एन. लोखंडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. सौ. एल.के. बागल व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचलंत का?