सोलापूर : रमजाननिमित्त जिल्हा संघातर्फे ना नफा ना तोटा तत्वावर दूध विक्री | पुढारी

सोलापूर : रमजाननिमित्त जिल्हा संघातर्फे ना नफा ना तोटा तत्वावर दूध विक्री

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : रमजान ईदनिमित्त सोलापूर जिल्हा दूध संघाच्यावतीने दूध विक्री करण्यात आली. या विक्रीला सोमवारी (दि. 2) सायंकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर ही विक्री संपूर्ण शहरात सुरू आहे. दूध खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी माठी गर्दी केली होती.

दूध संघाने प्रति लिटर 48 रूपये प्रमाणे विक्री केली. रमजाननिमित्त दोन लाख लिटर दूध वितरण करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्याअनुषंगाने सोमवारी सायंकाळी संपूर्ण शहरासह सात रस्ता, पार्क चौकसह विविध ठिकाणी टँकरच्या माध्यमातून दूध विक्रीला सुरुवात झाली.

रमजान दिवशीही शहरात दूध वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोलापूरसह गुलबर्गा, शहाबाद, विजापूर, गाणगापूर, अफजलपूर, उमरगा, बसवकल्याण, लातूर, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ याठिकाणीही दूध विक्रीची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा  

Back to top button