व्लादिमीर पुतीन यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया होणार ; ‘या’ नेत्याकडे देशाची सूत्रे जाणार | पुढारी

व्लादिमीर पुतीन यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया होणार ; 'या' नेत्याकडे देशाची सूत्रे जाणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनवर हल्ला करून जगाचं लक्ष आपल्याकडे खेचणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना कॅन्सरची लागण झालेली असून त्यावरील शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान देशाच्या कारभाराची सूत्रं रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाई पेत्रुशेव यांच्याकडे देण्यात येणार आहेत.

निकोलाई पेत्रुशेव हे पुतीन यांचे निटकवर्तीय मानले जातात. त्यामुळे युक्रेनमदील विषेश लष्करी कारवाईचं नेतृत्व त्यांच्याकडे असणार आहे. निकोलाई पेत्रुशेव हे रशियाच्या युद्धनितीचे प्रमुख मानले जातात. त्यांच्या सल्ल्यानुसारच पुतीन हे रशियन लष्कराला आदेश देतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच संरक्षण मंत्री सर्गेई शोईदू आणि सेना प्रमुख जनरल वालेरी गेरासिमोव यांना पुतीन यांनी बोलावून घेतले आणि युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.

व्लादिमीर पुतीन यांच्यावर कॅन्सरवरील शस्त्रक्रिया होणार असल्याचा दावा टेलिग्राम चॅनेल एसवीआरवर करण्यात आला आहे. रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुतीन यांना गेल्या १८ महिन्यांपासून पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सनचा आजार आहे. पुतीन यांनी पहिल्या सर्जरीला उशीर केला होता. मात्र, रशियाच्या ९ मेच्या विक्टरी डे परेड नंतर पुतीन यांच्यावर कर्करोगावरील शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती आहे.

एसवीआरनं केलेल्या दाव्यानुसार पुतीन यांच्यावरील शस्त्रक्रिया एप्रिल महिन्यातील दुसऱ्या पंधरावड्यात होणर होती. मात्र, यूक्रेन विरोधातील युद्धामुळं ते होऊ शकलेलं नाही. आता पुतीन यांच्यावर दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी तारीख निश्चित करण्यात येत आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध २४ फेब्रुवारीला सुरु झालं होतं. युद्ध सुरु होऊन ६७ दिवस होऊन गेलं तरी युद्ध थांबवण्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही.

Back to top button