

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला तर्फ लाख येथील काही भाविक चंद्रपूर येथील देवीला दर्शनासाठी जात होते. यावेळी राजदरी फाट्यावर रिक्षा पलटी होऊन एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर २ भाविक जखमी झाले. साहेबराव देवबा बंदुके ( वय ४७) असे मृत भाविकाचे नांव आहे. ही घटना आज (दि.२) दुपारी घडली.
असोला तर्फे लाख येथील काही भाविक चंद्रपूरला जाण्यासाठी नांदापूर रेल्वे स्टेशनला जात होते. यावेळी (एमएच ३८ – १८ १५) या क्रमांकाच्या रिक्षा चालकाचे राजदरी फाट्यावर नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा पलटी झाली. यात साहेबराव बंदुके यांच्या डोके, हातपायाला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजयमाला शिवाजी कराळे आणि बालाजी भीमराव ससाने यांना गंभीर इजा झाल्या. जखमीवर प्राथमिक उपचार पिंपळदरी येथे करून पुढील उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कळमनुरी पोलिसांमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. संतोष वराडे व सुनील रिठे यांनी पंचनामा केला. पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत. साहेबराव बंदुकीच्या अपघाती मृत्यूबद्दल ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का ?