‘नासा’ ऑगस्टमध्ये पाठवणार ‘सायकी’ लघुग्रहावर यान | पुढारी

‘नासा’ ऑगस्टमध्ये पाठवणार ‘सायकी’ लघुग्रहावर यान

फ्लोरिडा: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘सायकी अ‍ॅस्ट्रॉईड एक्सप्लोरर मिशन’साठी स्पेसएक्स आपले फाल्कन हेवी रॉकेट देणार आहे. हे लाँचिंग एक ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. नासाचे मिशन लाँच होण्यापूर्वी स्पेसएक्स आपल्या फाल्कन हेवी रॉकेटचे लाँचिंग जून महिन्यात करणार आहे. हे लाँचिंग फ्लोरिडास्थित केनेडी स्पेस सेंटरच्या लाँच पॅड 39 ए वरून करण्यात येणार आहे.
नासाचे ‘सायकी अ‍ॅस्ट्रॉईड एक्सप्लोरर मिशन’ लाँचिंगसाठी जवळजवळ तयार आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी त्याचे लाँचिंग करण्यात येणार आहे. असे असले तरी हे मिशन नेमक्या कोणत्या रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात येणार आहे, हे निश्‍चित झालेले नव्हते. मात्र, आता ते स्पष्ट झाले आहे. ते आता स्पेसएक्सच्या हेवी फाल्कन हेवी रॉकेटने लाँच करण्यात येणार आहे.

सायकी अ‍ॅस्ट्रॉईड एक्सप्लोरर मिशनअंतर्गत नासा सायकी या लघुग्रहावर यान पाठवणार आहे, ते पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक नागरिकाला 10 हजार कोटींचा मालक बनवू शकते. हा लघुग्रह पूर्णपणे लोह, निकेल आणि सिलिका या मौल्यवान धातूपासून बनले आहे. जर का लघुग्रहातील धातू विकले गेले तर जगातील प्रत्येक नागरिक अब्जाधीश बनेल. या यानाचे नावही ‘सायकी’ असेच आहे. ‘सायकी 16’ नामक या लघुग्रहावर जाणारे यान ऑगस्टमध्ये लाँच करण्यात येईल. हे यान मे 2023 मध्ये मंगळाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पडेल. त्यानंतर ते 2026 मध्ये या लघुग्रहाच्या कक्षेत प्रवेश करेल. तेथे हे यान या लघुग्रहाभोवती 21 महिने चकरा मारत त्याचा अभ्यास करणार आहे.

Back to top button