

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा
सातत्याने होणारी घरगुती गॅसची दरवाढ, शासनाकडून मिळणारे अनुदान बंद, यामुळे सर्वसामान्य गृहिणी आता गॅस ऐवजी ऐवजी चुली कडे वळू लागली आहे. केंद्र शासनाकडून पेट्रोलियम पदार्थांच्या किमती सातत्याने वाढत असून त्यामध्ये स्वयंपाकाचा घरगुती गॅस, व्यवसायिक गॅस यासह सर्वच गॅस आता दुप्पट ते तिप्पट दराने वाढले आहेत.
नुकतीच पेट्रोलियम कंपनीने गॅसच्या दरात पन्नास रुपयांची घसघशीत वाढ केली त्यामुळे आता 900 रूपये ते साडेनऊशे रुपयाला मिळणारा गॅस आता हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीचे स्वयंपाकघरातील आर्थिक बजेट कोलमडले असून यापूर्वी घरगुती गॅसवर केंद्र सरकार सबसिडी देत होते. परंतु ही सबसिडी गेल्या वर्षापासून पूर्णतः बंद केली असल्याने स्वयंपाकाचा गॅस आता गृहिणीला न परवडणारा झाला आहे. त्यातच ग्रामीण भागातील महिलांनी चुली बंद करून स्वयंपाकाच्या गॅस कडे आपला मोर्चा वळवला होता. परंतु याच गृहिणी महिलांनी पुन्हा वाढत्या महागाई मुळे ने पून्हा चुली कडे वळल्या आहेत.
केंद्रसरकारने मध्यंतरी दारिद्य्र रेषेखालील महिलांना मोफत गॅसचे वितरण केले. त्यातच गॅस ही मोफत भरून दिला. परंतु मोफत गँस बंद झाला आहे. आता हा गॅस पुन्हा भरण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत.हे या गृहिणीला परवडत नाही. कारण शेतातील मजुरीचे दर दिवसाला 200 रुपये मिळतात. त्यामुळे एक आठवडा केवळ गॅसच्या किमती साठी या महिलेला शेतात रोजगार करावा लावावे लागत आहे. परिणामी याच महिलांनी पुन्हा गॅस बंद करून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. त्यालाच प्राधान्य दिले असून गड्या आपल पहिलेच दिवस बरे होते आणि जुना संसार नेटका बर होताअसे म्हणत ग्रामीण भागात आता चुलीवर स्वयंपाक वाढू लागला आहे.
गॅस महागल्यामुळे पूर्वीसारखेच महिलांना आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. सरकारने गॅसचे दर कमी करावेत. नाहीतर पूर्वीसारखे घरोघरी गॅसऐवजी चूल दिसू लागेल.
– नंदा लोकरे (येरवळे)