परळी खोर्‍यात बिबट्याचा वावर

परळी खोर्‍यात बिबट्याचा वावर

परळी : पुढारी वृत्तसेवा; वनसंपदेने विपुल असलेल्या परळी खोर्‍यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातील काही गावांमधील पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वन विभागाने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

डोंगर कपारीतील शेताकडे जाताना उडतोय थरकाप!
डोंगर कपारीतील शेताकडे जाताना उडतोय थरकाप!

परळी खोर्‍यातील सज्जनगडच्या पायथ्यालगत असणार्‍या परळी, वाघवाडी, कारी या गावांच्या डोंगराळ भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. सातत्याने नागरी वस्तीत बिबट्या घुसून गुरांवर व शेळ्यांवर हल्ल्याच प्रमाण वाढले आहे. परळी सज्जनगड पायरी मार्गावर ट्रेकींग, धावणे यासाठी येणार्‍या युवकांना ही बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. कास, बामणोली या भागातही बिबट्या आढळल्याने शेतकर्‍यांमध्ये भीती आहे. वन विभागाकडून बिबट्यापासून संरक्षणासाठी जनजागृती केली जात असली तरी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांनीही आवश्यक ती सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

डोंगर कपारीतील शेताकडे जाताना उडतोय थरकाप!

परळी खोरे तसा भाग दुर्गम अन् डोंगरकपारीचा यामुळे याठिकाणी तुकडा पध्दतीने शेती केली जाते. यामुळे डोंगरकपारीत वसलेली आलवडी पाटेघर परिसरात असलेल्या शेतीत सध्या रान गवे, डुकरे, माकडे या वन्यजीव प्राण्यांच्या दहशीतीने पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. याठिकाणी जायचे म्हटले तरी शेतकर्‍यांचा थपकाप उडत आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news