माफ करा, एकमेकांशिवाय जगू शकत नाही म्हणत प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात आत्महत्या | पुढारी

माफ करा, एकमेकांशिवाय जगू शकत नाही म्हणत प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात आत्महत्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर जिल्ह्यातील तामसवाडी ता. नेवासा येथील प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील यात्री निवासमध्ये ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

राहुल विश्वास मचे (वय २५) आणि प्रियंका विकास भराडे (वय २२, रा. दोघेही तामसवाडी ता. नेवासा) अशी त्यांची नावे आहेत सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. ३१ डिसेंबरला रात्री या दोघांनी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहिलेली सापडली आहे.

आम्हाला माफ करा, आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही एकत्र मरत आहोत. नवीन वर्षाचा पहिला दिवसही पाहणार नाही असे दोघांनी त्यात म्हटले आहे.

चिठ्ठीत दोघांच्याही नातेवाईकांची नावे तसेच गावचा पत्ता आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांकही नमूद करण्यात आला आहे. दोघांकडील साहित्याची पिशवी मोबाईल आणि अन्य साहित्य बेडवर ठेवून दोघांनी ओढणीने पंख्याला गळफास लावून घेतला.

यात्री निवासमधील सहाव्या क्रमांकाची खोली दोन दिवसांपासून आतून बंद करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा दरवाजा ठोठावला. मात्र, काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे व्यवस्थापनाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडला असता दोघांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

हे ही वाचलं का ?

Back to top button