नारायण राणेंनी पुढे काय करावे हा त्यांचा प्रश्न : अजित पवारांचा चिमटा | पुढारी

नारायण राणेंनी पुढे काय करावे हा त्यांचा प्रश्न : अजित पवारांचा चिमटा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले. त्यानंतर राणेंच्या आता महाराष्ट्रावर लक्ष या घोषणेवर पवार यांनी नारायण राणेंना चिमटा काढला. १९९९-२००४ चा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा किस्सा सांगितला.

अजित पवार हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत पवार म्हणाले, निवडणुकीत यश अपयश येतच असते. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगलं यश मिळाले. नारायण राणेंनी पुढे काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावताना अजित पवार म्‍हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पडेल, अशी चर्चा सातत्याने केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रुपाने आणखी एक माणूस आला आहे. खरंतर नारायण राणेंनी मागे असेच सन १९९९ ते २००४ कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. याचा दाखला देत पवारांनी राणेंना चिमटा काढला.

हेही वाचलं का? 

Back to top button