

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (SATARA DCC Bank) निवडणुकीत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यात आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. तर ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी झाले आहेत.
सातारा जिल्हा बँक (SATARA DCC Bank) निवडणुकीतील कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत आठ मतांनी विजय मिळवला. त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला. मागील सहा दशकांपासून एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या कराड तालुका सोसायटी गटात स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन अध्यायास प्रारंभ झालाय.
एकूण मते – 49
झालेली मते – 49
वैध मते – 48
अवैध मते – 01
उमेदवार आणि मिळालेली मते
शशिकांत शिंदे- 24
ज्ञानदेव रांजणे- 25
विजयी उमेदवार – ज्ञानदेव रांजणे
मतांचे लीड – 1
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत सहकार मंत्री आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली. येथून बाळासाहेब पाटील हे 74 इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8 इतक्या मतांनी पराभव केला आहे.
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ निकाल
एकूण मते – 140
झालेली मते – 140
वैध मते – 140
अवैध मते – 000
उमेदवार आणि मिळालेली मते
बाळासाहेब पाटील 74
उदयसिंह पाटील 66
विजयी उमेदवार –
एकूण मते – 103
झालेली मते – 102
वैध मते – 103
अवैध मते – 000
उमेदवार आणि मिळालेली मते
शंभूराज देसाई ( गृहराज्यमंत्री) 44
सत्यजितसिंह पाटणकर 58
विजयी उमेदवार – सत्यजितसिंह
मतांचे लीड – 7