सातारा जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान सुरू | पुढारी

सातारा जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान सुरू

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज (रविवार) दहा जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत वीस उमेदवार रिंगणात असून, एकूण 1964 जण आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान होत असल्‍याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

सातारा जिल्हा बँकेसाठी आज सकाळपासूनच माण, खटाव, कोरेगाव, जावली, कराड, पाटण या सोसायटी मतदार संघात चुरशीने मतदान होत आहे. त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग, नागरी सहकारी बँका व पतसंस्था आणि महिला प्रतिनिधी मतदारसंघातही मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.

जावलीत आ. शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत होत असून, मतदान केंद्रांवर दोन्ही गटातील कार्यकर्ते भेटल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या सर्व मतदान केंद्रांवर उमेदवारांसह त्यांचे नेते व पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडले होते. मतदान केंद्रावर पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने किरकोळ प्रकार वगळता सर्व तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.

हेही वाचलं का?

Back to top button