आमीर खान तिसऱ्या लग्नाच्या तयारीत; होणारी बायको मुलगीपेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठी !

आमीर खान तिसऱ्या लग्नाच्या तयारीत; होणारी बायको मुलगीपेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठी !
Published on
Updated on

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. नूकतचं अभिनेता राजकुमार आणि त्याची प्रेयसी पत्रलेखा विवाहबंधनात अडकले आहेत. तर अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कैफ, अलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू असतानाच  हिकडे बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानच्या  (Aamir Khan) तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच आमिर खानने Mr. Perfectionistआपली दुसरी पत्नी निर्माती किरण रावशी (Kiran Rao) घटोस्फोट घेतला होता. घटोस्फोट झाल्यानंतर त्याने माध्यमांना सांगितल होतं, आम्ही जरी घटोस्फाेट घेतला असला तरी किरण ही माझी चांगली मैत्रिण राहणार आहे.

आमिर खान करणार को-स्टारशी लग्न…

सोशल मीडियावर आमिर खानच्या (Mr. Perfectionist) लग्नाची चर्चा चांगलीच रंगत आहे. त्याने किरण रावशी घटस्फाेट घेतल्यानंतर त्याच्या को-स्टारशी लग्न करणार असल्याची जोगदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे. आमिर आपल्या लग्नाची घोषणा त्याचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर करणार आहे. ही फिल्म एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाची आणि लग्नाची उत्सुकता लागून राहीली आहे.

फातिमा सना शेख आहे तरी कोण?

आमिर आणि किरण रावच्या अचानक घटोस्फाेटानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती आमिर आणि फातिमा रिलेशिनशीपमध्ये आहेत. कालांतराने ही चर्चा थांबली. आमिर आणि फातिमा यांनी दंगल आणि ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात दोघांनी काम केले होते.

Mr. Perfectionist २ लग्न, ३ मुले, अफेअर

बॉलिवूडमध्ये मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर आपल्या वैयक्तिक आयुष्यामूळे नेहमी चर्चेत असतो. त्याची आतापर्यंत २ लग्न झाली आहेत. पहिलं लग्न १९८७ मध्ये रीना दत्ताशी (Reena Dutta) केले. दोघांना इरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत. दोघांनी २००२ मध्ये  घटोस्फाेट घेतला. त्यानंतर त्याने निर्माती, दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले. दोघे सरोगसीच्या मदतीने आई-बाबा झाले. त्याचं नाव आझाद आहे. नुकतचं त्याने किरण रावशीही  घटोस्फाेट घेतला आहे.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news