बदलत्या जीवनशैलीमुळे हिमोग्लोबिनची कमतरता | पुढारी

बदलत्या जीवनशैलीमुळे हिमोग्लोबिनची कमतरता

सातारा : मीना शिंदे

सातारा : मीना शिंदे

बदलती जीवनशैली, फास्टफूडचा अतिरेक, व्यायामाचा अभाव, जीभेचे चोचले यामुळे पौष्टिक आहाराला फाटा दिला जात आहे. परिणामी शरीराला आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होत असून, विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने कुटुंबाचे स्वास्थ्य सांभाळणार्‍या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती झाली आहे. तरीदेखील बदलती जीवनशैली, फास्टफूडचा अतिरेक, व्यायामाचा अभाव, जीभेचे चोचले यामुळे पौष्टिक आहाराला फाटा दिला जात आहे. परिणामी शरीराला आवश्यक हिमोग्लोबिन, लोह, प्रथिने आदी आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे महिलांना विविध आजार व आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे डोळे, हाताचे तळवे पिवळसर दिसतात तसेच धाप लागणे, वारंवार थकवा जाणवणे, पायाला गोळे येणे अशी लक्षणे जाणवतात. विशेषत: महिलांना हिमोग्लोबीनची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते.

आज महिला सर्व आघाड्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. मात्र, त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अद्यापही समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याने महिलांना कौटुंबिक जबाबदार्‍या जास्त असतात. त्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. गरोदरपणामध्ये त्यांना सकस व पौष्टिक आहार मिळत नसल्याने जन्माला येणारे बालकही कमजोर जन्मते. अ‍ॅनिमियाचा धोका संभवत असून अ‍ॅनिमिया उद्भवण्यास कारणीभूत इतर कारणांपैकी हिमोग्लोबिनची कमतरता हेही एक कारण आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, अन्यथा भविष्यात गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामुळे घटते हिमोग्लोबीन…

  • आरोग्याची हेळसांड होणे
  • मासिक पाळीत जादा रक्तस्राव होणे
  • बाळंतपणात होणारी शारीरिक हानी
  • ताज्या व सकस आहाराचा अभाव
  • पुरेशा विश्रांतीचा अभाव

याचा हवा आहारात समावेश

प्रथिने व लोहयुक्त सकस आहार घेतल्यास महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, टोमॅटो यांचा आहारामध्ये समावेश करावा. हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी दररोज सकाळी गूळ-शेंगदाणे खावेत. सफरचंद, डाळिंब आणि काळ्या मनुक्याबरोबरच सुकामेवा खावा,असे तज्ज्ञ सांगतात.

  • साडेपाच हजार भावी गुरुजी देणार परीक्षा
    महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे. अ‍ॅनिमियाच्या इतर कारणांपैकी एक म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता हे आहेच. या रुग्णांचे डोळे पिवळसर आणि निस्तेज दिसतात. स्वत:चे आरोग्य सांभाळणे हेही कौटुंबिक जबाबदारीइतकेच महत्त्वाचे आहे, ही मानसिकता महिलांमध्ये रुजण्याची गरज आहे.

– डॉ. अनघा गोळे, नेत्रतज्ज्ञ

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

Back to top button