“हॅलो पोलीस स्टेशन? बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये”; विरहात असलेल्या प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय? | पुढारी

“हॅलो पोलीस स्टेशन? बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये”; विरहात असलेल्या प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

छिंदवाडा (मध्य प्रदेश): जिल्ह्यात प्रियकर-प्रेयसीच्या भांडणाची एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीने प्रियकर आपल्याशी बोलत नसल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तक्रारी नंतर पोलिसांनी मध्यरात्री दोघांना बोलवून घेतले आणि त्याची समजूत काढून त्यांचे लग्न लावून दिले.

आपल्याकडे नवरा-बायकोच्या भांडणात शहाण्याने पडू नये, असं नेहमी म्हटलं जातं. कारण जेव्हा दोघांमध्ये भांडण होते, तेव्हा दोघांची तोंड वेगवेगळ्या दिशांना जातात. मात्र कुणाला कळायच्या आत दोघांमध्ये समेट घडून येतो. दोघांची गोडी गुलाबी झाल्यानंतर मध्यस्थी करणाऱ्याची अवस्था मात्र केविलवाणी होते. दोघेही आनंदाने एकत्र नांदू लागतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये असंच काहीसं घडलं, मात्र ते गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डच्या बाबतीत.

दोघांमध्ये नेमकं काय घडलं?

सीएसपी मोतीलाल कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील एका मुलीचे सरानी येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस होता. मात्र त्या दिवशी मुलगी काही कारणास्तव मुलाशी बोलू शकली नाही. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि मुलाने मुलीशी बोलणे बंद केले. मुलीने संतापलेल्या प्रियकरापर्यंत पोहोचण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. बॉयफ्रेण्ड मात्र काही तिच्याशी पुन्हा संवाद साधायच्या मनस्थितीत नव्हता. मात्र बॉयफ्रेण्डच्या या भुमिकेने तरुणी चांगलीच खूपच अस्वस्थ झाली. बॉयफ्रेण्डशी पुन्हा बोलण्यासाठी काय करायचं याची कल्पना तिला नव्हती.

कोल्हापूर : गडहिंग्लज परिसरात निघतोय गांजाचा धूर!

100 नंबरवर पोलिसांना कॉल

ज्या बॉयफ्रेण्डशी लग्न करून सुखी संसार करण्याची स्वप्नं रंगवली, त्यानेच अचानक बोलने बंद केल्याने तरुणीची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. अखेर काहीच न सुचल्याने मुलीने अखेर पोलिसांना 100 नंबरवर कॉल केला आणि पोलिसांनाच विनंती केली की, त्यांनी प्रियकराला आपल्याशी बोलण्यास सांगावे.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर

अनेक गुन्हेगारांना बोलते करणारे पोलिसही या विचित्र फोनमुळे बुचकळ्यात पडले. काय करावं ते त्यांनाही समजेना. पण तिला मदत तर करायची होती. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलाला पोलिस ठाण्यात बोलावले. मध्यरात्री पोलीस ठाण्यात झालेल्या समुपदेशनानंतर पोलिसांनी त्यांच्यात समेट घडवून आणला आणि दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघांच्याही घरातील लोकांनी होकार दिला आणि या जोडप्याने आर्य समाज मंदिरात सात फेरे घेतले.

हेही वाचा: 

कृषी कायदे रद्द : कहीं खुशी, कहीं गम

ठाकरे-पवारांनीच अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले; किरीट सोमय्यांचा आरोप

 

Back to top button