महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, दि. 21 रोजी होणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रांवर 5 हजार 580 भावी गुरुजी परीक्षा देणार आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू अशा चार माध्यमांमधून ही परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कन्याशाळा सातारा, भवानी विद्यालय सातारा, अनंत इंग्लिश स्कूल सातारा, एलबीएस कॉलेज सातारा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉलेज सातारा, शिवाजी कॉलेज सातारा, यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, छ. शाहू अॅकॅडमी सातारा, श्रीपतराव पाटील हायस्कूल सातारा, सुशीलादेवी विद्यालय सातारा व महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा या 13 केंद्रांवर होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
या परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत. पेपर सकाळी 10.30 ते 1 व दुपारी 2 ते 4.30 यावेळेत होणार आहेत. ही परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी या चार माध्यमांमध्ये होणार आहे. मराठी माध्यमासाठी 5 हजार 302, इंग्रजी 223, उर्दू 21, हिंदी 34 असे मिळून 5 हजार 580 भावी गुरुजी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी 13 केंद्र संचालक, 1 उपकेंद्र संचालक, 48 पर्यवेक्षक, 234 समवेक्षक, 26 क्लार्क व 52 शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.
https://youtu.be/AKuoLpW0oO4