कराड : महामार्गावर कारची ट्रकला धडक, तीन ठार

karad news
karad news

कराड : पुढारी वृत्तसेवा – पुणे-बंगळूर महामार्गावर कारने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. शनिवार दिनांक 14 रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

संबंधित बातम्या-

नितीन बापूसाहेब पोवार (वय 34) मनीषा आप्पासाहेब जाधव (वय 31) व अभिषेक असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. नितीन पोवार हे कोल्हापूर येथे पोलीस खात्यात कार्यरत होते.

तिघेही मृत एकाच कुटुंबातील आहेत. अपघातात मृत्यू झालेले नितीन पोवार हे आपली बहीण मनीषा जाधव व भाचा अभिषेक यांच्यासोबत सातारा बाजूकडे जात असताना हा अपघात झाला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या माहितीची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी कार पोलीस हवालदार नितीन पोवार हे स्वतः चालवत होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेल जवळ आयशर ट्रक महामार्गाच्या बाजूला उभा होता. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगात निघालेल्या कारने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये नितीन पोवार यांच्यासह त्यांची बहिण आणि भाचा असे तिघेजण जागीच ठार झाले. तर अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा करण्याचे कार्यवाही सुरू होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news