सातारा : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या प्रकल्पाला गती | पुढारी

सातारा : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या प्रकल्पाला गती

कराड : पुढारी वृत्तसेवा; देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या ऑलिंपिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या 39 व्या पुण्यतिथीदिनी आज (दु.१४)  ऑलिंपिकवीर पैलवान खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा संकुलाचा मागील वीस वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पास गती मिळाली आहे. राज्य क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी आज कराड प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत दोन ते तीन दिवसात कुस्ती संकुलाचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर स्मशानभूमी रस्ता, शासकीय जागेतील अतिक्रमण याबाबत महसूल विभागाने निर्णय घ्यावा अशी सूचना करत सद्यस्थितीत ताब्यात असलेल्या 36 गुंठे जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येईल असेही क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. दोन ते तीन पर्याय असलेला आराखडा सादर करून त्यास त्वरित मान्यता दिली जाईल, कुस्ती संकुल साठी निधी उपलब्ध असून तो त्वरित वर्ग केला जाईल अशी ग्वाही क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली आहे. या बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, स्वर्गीय खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव, गोळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button