Uttarakhand rain | उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार, पत्त्याच्या बंगल्यासारखी कॉलेजची इमारत कोसळली (व्हिडिओ) | पुढारी

Uttarakhand rain | उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार, पत्त्याच्या बंगल्यासारखी कॉलेजची इमारत कोसळली (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील मालदेवता येथील डेहराडून डिफेन्स कॉलेजची इमारत सोमवारी (दि.१४) संततधार पावसामुळे कोसळली. पत्त्याच्या घरासारखी ही इमारत काही सेकंदात कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) डेहराडून आणि नैनितालसह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. (Uttarakhand rain)

डेहराडून डिफेन्स कॉलेज गढवाल हिमालयाच्या पायथ्याशी आहे. कॉलेजने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की, कॉलेजमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि तांत्रिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि संरक्षण सेवा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते. दरम्यान, हवामान खात्याने पुढील २४ तास डेहराडून, पौरी, टिहरी, नैनिताल, चंपावत आणि उधम सिंग नगर मधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Uttarakhand rain)

हेही वाचा : 

Back to top button